शहरातील 53 जणांचा समावेश
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सात दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र या लॉकडाऊनमध्येही कोरोना रुग्णांची वाढती संख्या कायम आहे. दिवसाला दोनशेच्या पुढे नवे रुग्ण आढळून येत आहेत. यातच काल, शनिवारी सर्वाधिक उच्चांकी रुग्णांची भर पडली होती. यात 13 जणांचा बळी तर 406 जण बाधित आढळून आले होते.
आज पुन्हा यात शंभर रुग्णांची भर पडली आहे. काल, शनिवारी रात्री 12 पासून आज दुपारी 12 पर्यंतची ही संख्या आहे. यात शहरातील 53 जणांचा समावेश आहे. चार वाजेपर्यंत इचलकरंजी येथील दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर, सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणखी 74 जणांची यात भर पडली. यामुळे आतापर्यंत ही संख्या 184 झाली.
रुग्णांची संख्या खालीलप्रमाणे :
ताराबाई रोड 3 , रंकाळा टॉवर 6 , सानेगुरुजी वसाहत 2 , मनिषा नगर 1, उत्तरेश्वर पेठ 5, मोतीनगर 2 , अंबाई टँक 2, लाइन बाजार 1, कोल्हापूर शहर 3, लक्ष्मीपुरी १, लाईन बजार 5, वसगडे ३, राजारामपुरी 14 वि गल्ली 1, कनान नगर-1, पाचगाव 2 , कसबा बावडा 3, पल्स हॉस्पिटल , जुना बुधवार पेठ १, शिये ६, सरस्वती मेडिसिटी 1, जवाहर नगर 1, न्यू शाहूपुरी 2, गांधी नगर 2 रविवार पेठ 1 , मंगळवार पेठ 1, जगताप नगर 1, संभाजीनगर 1, करवीर 1, रंकाळा टॉवर 1 चिकुर्डे १, खुपिरे 1, कणेरी 1, नागदेववाडी 2 , कागल गैबी चौक 3 ., कागल निपाणी वेस ४, हातकणंगले 1, इचलकरंजी १, चिंचवड 1, खरी कॉर्नर गांधी मैदान 1, संग्राम चौक इचलकरंजी 1, हुपरी 1, श्रीराम नगर इचलकरंजी 1, शिवाजी पार्क 1, कोल्हापूर 1, राधानगरी 3, हुपरी 1 .शास्त्रीनगर 1, जयसिंग पार्क कागल 1, सीपीआर १, बांबवडे १, कुरुंदवाड 2
जिल्ह्यात चार वाजेपर्यंत इचलकरंजी येथील दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.यामध्ये सवानंद हॉस्पिटल 2, जुना बस स्टँड रोड १, किसान चौक १, हत्ती चौक १, दानोळी १, नदीवेस नाका 2, शिरढोण 1, माने नगर रेंदाळ 1 येथील रुग्णांचा समावेश आहे.
तर, सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणखी 74 जणांची यात भर पडली. यामध्ये सातवे १, सावर्डे १, कोतोली 3, देवाळे १, माजगाव २, पोरले ६, उचगाव 2 , शिये ३, पापाची तिकटी जोशी गल्ली 2 , पट्टणकोडोली १, अंबाई टँक १, आंबेवाडी १, साबळेवाडी २, साळुंके पार्क १, गडमुडशिंगी १, सीपीआर हॉस्पिटल १, नागाळा पार्क 5 , गोकुळ शिरगाव २, शिवाजी पेठ १, गांधीनगर २, शिरोळ 1 , चिंचवड जैन मंदिर 2 , जयसिंगपूर ७, तेरवाड १, कवठेगुलंद 2 , मजरेवाडी १, हेरवाड 1, कुरुंदवाड २, शिरदवाड 2 , खोची १, शहापूर ४, रेंदाळ २, हेरले १, चंदुर ५ येथील रुग्णांचा समावेश आहे.








