7 लाख 30 हजारांचे उद्दिष्ट, 1 लाख 55 हजार जणांना लस
कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ होऊन 2 महिने झाले. आरोग्य सेवकांचे 86 टक्के तर प्रंटलाईन वर्कर्सचे 59 टक्के लसीकरण पुर्ण झाले. 7 लाख 30 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे, आतापर्यत दीड लाख जणांनी प्रतिबंधक लस घेतली आहे. दरम्यान, कोविशिल्डसोबत आता कोव्हॅक्सिन लस देण्यालाही परवानगी मिळाली आहे. काही केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीकरण सुरू झाल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
जिल्ह्यात 16 जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला टप्पा सुरू झाला. जिल्ह्यातील 11 केंद्रांवर आरोग्यसेवक, आशा स्वयंसेविकांना लस दिली. लसीकरण मोहिमेला दोन महिने पुर्ण झाले. दरम्यान दुसर्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स असलेल्या पोलीस, होमगार्ड, महसुल कर्मचार्यांना तर, तिसर्या टप्प्यात 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त आणि 60 वर्षावरील ज्येष्ठांना लसीकरण सुरू केले आहे. सद्यस्थितीत 152 केंद्रांवर कोरोना लसीकरण सुरू आहेत. त्यात जीवनदायी योजनेतील 30 खासगी हॉस्पिटल्समध्ये 250 रूपयांत लस दिली जात आहे. लसीकरणाला प्रतिसाद वाढत आहे. आजपर्यत कोव्हिशिल्ड लस दिली जात होती. आता कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. काही केंद्रांवर ती देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठांनी दिली.
जिल्ह्यात गुरूवारी 377 आरोग्य सेवकांनी पहिला तर 542 जणांनी दुसरा डोस घेतला. आजपर्यंत 32 हजार 885 आरोग्यसेवकांना पहिला तर 12 हजार 576 जणांना दुसरा डोस घेतला आहे. आरोग्यसेवकांच्या लसीकरणाचे 86 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. गुरूवारी 1 हजार 83 फ्रंटलाईन वर्कर्सनी पहिला तर 393 जणांनी दुसरा डोस घेतला. आजपर्यंत 19209 जणांनी पहिला तर 2820 जणांनी बुस्टर डोस घेतला असून 59 टक्के लसीकरण झाले आहे.
6 मार्चपासून 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व 60 वर्षावरील ज्येष्ठांना तिसर्या टप्प्यात लसीकरण सुरू आहे. गुरूवारी 2 हजार 894 व्याधीग्रस्तांनी तर 10 हजार 792 ज्येष्ठांनी लस घेतली. गेल्या 12 दिवसांत 18 हजार 6 व्याधीग्रस्तांनी तर 84 हजार 954 ज्येष्ठांनी लस घेतली आहे. आजपर्यंत 1 लाख 55 हजार जणांनी प्रतिबंधक लस घेतली आहे. तसेच 15 हजार 385 जणांनी बुस्टर डोस घेतला आहे. जिल्ह्यात कोव्हिशिल्ड लस देण्यात येत होती. आता कोव्हॅक्सिन लस देण्यात परवानगी मिळाली आहे. ही लस काही केंद्रांवर देण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
आरोग्यसेवक : पहिला डोस : 32885, दुसरा डोस : 12567 : 86 टक्के
पंटलाईन वर्कर्स : पहिला डोस : 19209, दुसरा डोस : 2820 : 59 टक्के
व्याधीग्रस्त रूग्ण : पहिला डोस : 18006 : ज्येष्ठ नागरीक : 84945









