5 मृत्यू, 159 नवे रूग्ण, 156 कोरोनामुक्त
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी गेल्या 24 तासांत कोरोनाने 5 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शहरातील दोन अन् परजिल्ह्यातील एक आहे. दिवसभरात 159 नवे रूग्ण आढळले तर 156 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 1 हजार 298 झाली आहे. कोरोना मृत्Îूसह नव्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने 5 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातील कदमवाडी आणि बुधवार पेठ येथील महिला, करवीर तालुक्यातील पाचगाव येथील महिला आणि उजळाईवाडी येथील पुरूष तर सांगली येथील पुरूषाचा समावेश आहे. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5,721 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 3059, नगरपालिका क्षेत्रात 821, शहरात 1245 तर अन्य 596 आहेत. दिवसभरात 156 जण कोरोनामुक्त झाले.
कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 97 हजार 832 झाली आहे. गेल्या 24 तासांत 159 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 3, भुदरगड 1, चंदगड 2, गडहिंग्लज 8, गगनबावडा 0, हातकणंगले 16, कागल 0, करवीर 22, पन्हाळा 6, राधानगरी 2, शाहूवाडी 2, शिरोळ 19, नगरपालिका क्षेत्रात 22, कोल्हापुरात 51 तर परजिल्ह्यातील 5 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 2 लाख 4 हजार 851 झाली आहे. सद्यस्थितीत शहरात 17 आणि ग्रामीण भागात 228 जण होम कोरोंटाईन आहेत. ग्रामीण भागात होम क्वांरटाईन रूग्णांमध्ये घट झाली असून शहरात वाढ झाल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
कोरोना रूग्ण : 159 एकूण : 2,04,851
कोरोनामुक्त : 156 एकूण : 1,97,832
कोरोना मृत्यू : 5 एकूण मृत्यू : 5721
सक्रीय रूग्ण : 1298









