प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात शुक्रवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 6 जणांचा मृत्यू झाला. शहरातील तिघांचा त्यात समावेश आहे, पण परजिल्ह्यातील मृत्यू नोंद शुन्य राहिली. दिवसभरात 197 नवे रूग्ण आढळले तर 455 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 2 हजार 36 आहे. मृत्यू, नव्या रूग्णांत वाढ झाली आहे तर सक्रीय रूग्णांत घट झाली आहे. गगनबावडा अन् भुदरगड तालुक्यात नवी रूग्ण नोंद शून्य राहिली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने सहा तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शहरातील मंगळवार पेठेतील दोघांचा, शाहूपुरीतील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यातील वाशी, खिंडी व्हरवडे व इचलकरंजी येथील प्रत्येकी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 653 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 3 हजार 24, नगरपालिका क्षेत्रात 814, शहरात 1 हजार 224 तर अन्य 590 आहेत. दिवसभरात 455 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 94 हजार 392 झाली आहे. गेल्या 24 तासांत 197 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 3, भुदरगड 0, चंदगड 1, गडहिंग्लज 10, गगनबावडा 0, हातकणंगले 39, कागल 13, करवीर 20, पन्हाळा 5, राधानगरी 3, शाहूवाडी 16, शिरोळ 10, नगरपालिका क्षेत्रात 27, कोल्हापुरात 49, तर अन्य 1 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 2 लाख 2 हजार 81 झाली आहे. परजिल्ह्यातील कोरोना मृत्यूची नोंद निरंक राहिली. सद्यस्थितीत शहरात 46 आणि ग्रामीण भागात 507 जण होम कोरोंटाईन आहेत.
Previous Articleसांगली जिल्ह्यातील तळवडेत दूध भेसळप्रकरणी छापेमारी
Next Article राफेल नदाल उर्वरित हंगामातून बाहेर









