प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात गुरूवारी, गेल्या 24 तासात कोरोनाचे 1 हजार 611 नवे रूग्ण आढळले. कोरोनाने 30 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 हजार 346 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 13 हजार 566 झाली आहे. कोरोना मृत्यू, नव्या रूग्णांसह सक्रीय रूग्णांत वाढ झाली आहे. कोरोनामुक्तांमध्ये घट झाली आहे. गगनबावडा तालुक्यात नव्या रूग्णांची नोंद निरंक राहिली. परजिल्ह्यातील एक तर शहरातील 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाने 30 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत कोरोना बळींची संख्या 4 हजार 975 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 678, नगरपालिका क्षेत्रात 718, शहरात 1 हजार 36 तर अन्य 543 आहेत. दिवसभरात 1 हजार 346 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 52 हजार 869 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 611 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 43, भुदरगड 38, चंदगड 30, गडहिंग्लज 48, गगनबावडा 0, हातकणंगले 170, कागल 67, करवीर 301, पन्हाळा 75, राधानगरी 76, शाहूवाडी 66, शिरोळ 147, नगरपालिका क्षेत्रात 131, कोल्हापुरात 386 तर अन्य 33 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 71 हजार 410 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून गुरूवारी 15 हजार 611 अहवाल आले. त्यापैकी 13 हजार 985 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 3 हजार 876 अहवाल आले. त्यातील 3 हजार 655 निगेटिव्ह आहेत. अँन्टीजेन टेस्टचे 5 हजार 79 अहवाल आले. त्यातील 4 हजार 638 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 6 हजार 656 रिपोर्ट आले. त्यातील 5 हजार 692 निगेटिव्ह आहेत.
शहरातील 8 जणांचा कोरोनाने मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील एकाचा आणि कोल्हापूर शहरातील 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील कोरोना मृत्यूमध्ये नाना पाटील नगर, मुक्त सैनिक वसाहत, कसबा बावडा, जरगनगर, सुभाषनगर, शांती उद्यान, राजोपाध्येनगर, अयोध्या टाŸवर येथील व्यक्तींचा समावेश आहे.
सक्रीय रूग्ण : 13,566 रूग्ण कोरोनामुक्तीचा दर टक्क्यांत : 89.18 टक्के एकूण चाचण्या - गुरूवार : 15611 एकूण : 12,39,420 मृतांची संख्या - 30 जिल्हा : 29 बाहेरील : 1 आजअखेर मृत संख्या - 4975 जिल्हा : 4442 अन्य : 543