प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात बुधवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 45 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये जिल्ह्यातील 41 जण आहेत. कोरोना मृत्यूसंख्येत घट झाली आहे. पण गेल्या 24 तासांत 2 हजार 599 असे उच्चांकी नवे रूग्ण आढळले. दिवसभरात 1 हजार 622 जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात कोल्हापूर शहरासह, करवीर, कागल, हातकणंगले, पन्हाळा, शिरोळ, इचलकरंजी पालिका क्षेत्रात शंभरांवर रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच 11 हजार 667 स्वॅबची तपासणी झाली. सक्रीय रूग्णसंख्या 14 हजार 181 आहे. सक्रीय रूग्णसंख्या वाढल्याने धोकाही वाढला आहे.
जिल्ह्यात बुधवारी कोरोनाने 45 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये परजिल्ह्यातील चौघे आहेत. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 3 हजार 493 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 1 हजार 786, नगरपालिका क्षेत्रात 566, शहरात 712 तर अन्य 429 आहेत. दिवसभरात 1 हजार 622 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 85 हजार 612 झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2 हजार 599 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 41, भुदरगड 65, चंदगड 39, गडहिंग्लज 26, गगनबावडा 25, हातकणंगले 363, कागल 101, करवीर 358, पन्हाळा 135, राधानगरी 53, शाहूवाडी 45, शिरोळ 264, नगरपालिका क्षेत्रात 270, कोल्हापुरात 647 तर अन्य 167 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 3 हजार 294 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून बुधवारी 5 हजार 719 अहवाल आले. त्यापैकी 4 हजार 610 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 3 हजार 653 अहवाल आले. त्यातील 2 हजार 992 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 2 हजार 835 रिपोर्ट आले. त्यातील 1 हजार 930 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 11 हजार 667 जणांचे स्वॅब रिपोर्ट आले.