प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात मंगळवारी कोरोनाने 35 जणांचा मृत्यू झाला, तर 717 नवे रूग्ण दिसून आले. दिवसभरात 556 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 7 हजार 875 वर पोहोचली आहे. जिल्हय़ात कोरोनाने 26 जणांचा मृत्यू झाला. दोन दिवसांच्या तुलनेत रूग्णसंख्या, कोरोना मृत्यू संख्या कमी झाल्याने कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे.
जिल्हय़ात मंगळवारी कोरोनाने 35 जणांचा मृत्यू झाला. कोरोना बळींची संख्या 2 हजार 146 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 1 हजार 37, नगरपालिका क्षेत्रात 389, शहरात 470 तर अन्य 250 जण आहेत. दिवसभरात 2 हजार 473 जणांची तपासणी केली. सक्रीय रूग्णसंख्या 7 हजार 875 झाली आहे. दिवसभरात 556 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 54 हजार 661 झाली आहे, अशी माहिती शल्य चिकित्सक डाŸ. अनील माळी यांनी दिली.
गेल्या 24 तासांत 717 नवे रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 6, भुदरगड 61, चंदगड 29, गडहिंग्लज 29, गगनबावडा 6, हातकणंगले 96, कागल 22, करवीर 80, पन्हाळा 49, राधानगरी 11, शाहूवाडी 30, शिरोळ 13, नगरपालिका क्षेत्रात 72 कोल्हापुरात 183 तर अन्य 30 जणांचा समावेश आहे. कोरोनाची एकूण रूग्णसंख्या 64 हजार 634 झाली आहे.
शहरात 870 तर ग्रामीण भागात 3 हजार 955 जणांना होम कोरोंटाईन केले आहे. शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लŸबमधून मंगळवारी 2 हजार 96 अहवाल आले. त्यापैकी 1 हजार 680 ा†नगा†टव्ह आहेत. अŸन्टीजेन टेस्टचे 1 हजार 417 अहवाल आले. त्यातील 1 हजार 203 ा†नगा†टव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 357 रिपोर्ट आले. त्यातील 238 निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने 35 जणांचा मृत्यू झाला. त्यात जिल्हय़ातील 26 तर परजिल्हय़ातील 9 जणांचा समावेश आहे.
जिल्हय़ात मंगळवारी कोरोनाने बळी गेलेल्यांत सीपीआर हाŸस्पिटलमध्ये शिंगणापुर sयेथील 55 वर्षीय महिला, कार्वे नाका कराड येथील 39 वर्षीय पुरूष, राजारामपुरीतील 60 वर्षीय महिला, आटके करवीर येथील 48 वर्षीय महिला, गोकुळ शिरगाव येथील 70 वर्षीय पुरूष, नवे पारगाव येथील 74 वर्षीय पुरूष, मंगळवार पेठेतील 58 वर्षीय महिला, फुलेवाडी येथील 72 वर्षीय महिला, नेर्ले तामगाव येथील 63 वर्षीय पुरूष, तेलवे पन्हाळा येथील 70 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. इचलकरंजी येथील आयजीएम हाŸस्पिटलमध्ये कोल्हापुरातील 68 वर्षीय महिला, ल्हासुर्णे इंदापूर येथील 62 वर्षीय महिला, शहापूर येथील 55 वर्षीय पुरूष, शाहूनगर माळभाग येथील 72 वर्षीय पुरूष, दत्तवाड शिरोळ येथील 75 वर्षीय पुरूष, जुना चंदूर रोड येथील 75 वर्षीय पुरूष, दत्तनगर 13 वी गल्ली इचलकरंजी येथील 60 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला, गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात कुंभारहाळ येथील 70 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.
शहरातील खासगी हाŸस्पिटलमध्ये इस्लामपूर येथील 63 वर्षीय महिला, कळंबा येथील 53 वर्षीय महिला, कडगाव भुदरगड येथील 46 वर्षीय पुरूष, नवे पारगाव येथील 61 वर्षीय पुरूष, निगवे दुमाला येथील 65 वर्षीय महिला, सुखवाडी पलुस येथील 65 वर्षीय पुरूष, शिवाजी पार्क येथील 84 वर्षीय पुरूष, कबनूर येथील 42 वर्षीय पुरूष, उजळाईवाडी येथील 70 वर्षीय महिला, कणेरी येथील 65 वर्षीय पुरूष, पाटेगाव पालघर येथील 34 वर्षीय पुरूष, नावली येथील 68 वर्षीय पुरूष, देवगड येथील 54 वर्षीय पुरूष, पाटव मंगळवेढा येथील 54 वर्षीय पुरूष, एसएससी बोर्ड परिसरातील 65 वर्षीय पुरूष, हिंगणवाडी शाहूवाडी येथील 63 वर्षीय महिला आणि वाटेगाव सांगली येथील 85 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









