प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हÎात बुधवारी कोरोनाने नऊ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 6 महिलांचा समावेश आहे. शहरातील तिघांसह जिल्हÎातील 7 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत 388 नवे रूग्ण दिसून आले. तर 154 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 2 हजार 746 झाली आहे. कोरोना बळींची संख्या 1 हजार 837 झाली आहे.
कोरोनाने बुधवारी मृत्यू झालेल्यांत जिल्हÎातील 7 जण आहेत. सीपीआर हॉस्पिटलमध्ये भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथील 46 वर्षीय पुरूष, शहरातील मंगळवार पेठेतील 70 वर्षीय महिला, ताराबाई पार्क येथील 35 वर्षीय महिला, पापाची तिकटी कुंभार गल्ली येथील 76 वर्षीय महिला आणि सांगली जिल्हÎातील कानडे (ता. शिराळा) येथील 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. शास्त्रीनगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये सातारा जिल्हÎातील निंभोशी (ता. फलटण) येथील वर्षीय 61 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील वळीवडे येथील 70 वर्षीय महिलेचा खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला तर कदमवाडी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये करवीर तालुक्यातील सांगरूळ येथील 60 वर्षीय पुरूष आणि हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथील 62 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोनाने 1 हजार 837 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ग्रामीण भागातील 887, नगरपालिका क्षेत्रात 356, शहरात 416 तर अन्य 178 जण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
गेल्या 24 तासांत 154 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 50 हजार 807 झाली आहे. तसेच 388 नवे रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 8, भुदरगड 4, चंदगड 3, गडहिंग्लज 29, गगनबावडा 0, हातकणंगले 28, कागल 10, करवीर 32, पन्हाळा 25, राधानगरी 12, शाहूवाडी 5, शिरोळ 28, नगरपालिका क्षेत्रात 26 कोल्हापुरात 159 तर अन्य 19 जणांचा समावेश आहे. कोरोना रूग्णांची एकूण संख्या 55 हजार 390 झाली आहे. दिवसभरात 1हजार 913 जणांची तपासणी केली. त्यातील 351 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. शहरात 578 तर ग्रामीण भागात 1 हजार 19 जणांना होम कोरोंटाईन केले आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून बुधवारी आलेल्या 2 हजार 437 अहवालापैकी 2 हजार 172 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 72 अहवाल आले. त्यातील 54 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 481 रिपोर्ट आले. त्यातील 341 निगेटिव्ह आहेत. सध्या 2 हजार 746 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माळी यांनी दिली.









