प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्यात रविवारी महिलेसह शहरातील दोघांचा व सांगलीतील एकाचा कोरोनाचे मृत्यू झाला, दिवसभरात 163 नवे रूग्ण मिळून आले तर 78 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 1 हजार 84 झाली आहे.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये रविवारी सोमवार पेठेतील 86 वर्षीय महिला आणि कसबा बावडा येथील 50 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. तसेच सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील 65 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1 हजार 784 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 865, नगरपालिका क्षेत्रात 352, कोल्हापूर शहरात 398 तर अन्य 169 जणांचा समावेश आहे. 78 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 49 हजार 773 झाली आहे.
गेल्या 24 तासांत 163 नवे रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 1, भुदरगड 10, चंदगड 0, गडहिंग्लज 2, गगनबावडा 0, हातकणंगले 9, कागल 7, करवीर 21, पन्हाळा 2, राधानगरी 1, शाहूवाडी 3, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 17 कोल्हापुरात 69 तर अन्य 21 जणांचा समावेश आहे. कोरोना रूग्णांची एकूण संख्या 52 हजार 643 झाली आहे.
जिल्ह्यात रविवारी 1122 जणांची तपासणी केली. त्यातील 90 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. शेंडा पार्क येथून आलेल्या 325 अहवालापैकी 176 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 156 अहवाल आले. त्यातील 145 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 443 रिपोर्ट आले. त्यातील 347 निगेटिव्ह आहेत. सध्या 1 हजार 86 रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात 204 तर ग्रामीण भागात 423 जणांना होम कोरोंटाईन केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
कोरोना रूग्ण ः 163
एकूण कोरोना रूग्ण ः 52643
कोरोनामुक्त ः 78
एकूण कोरोनामुक्त ः 49773
कोरोना मृत्यू ः 3
एकूण कोरोना मृत्यू ः 1784
सक्रीय रूग्ण ः 1086 कोरोना लसीकरण ः पहिला डोस ः ः दुसरा









