प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गुरूवारी खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाने दोघींचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1754 झाली. शहरात चित्रिकरणासाठी आलेल्यांपैकी 30 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोरोना रूग्णसंख्या 24 तासांत दुप्पट झाली. जिल्ह्यात 62 नवे रूग्ण दिसून आले तर 23 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 374 वर पोहोचल्याने कोरानाच्या दुसऱया लाटेची चाहूल लागली आहे.
नागाळा पार्क येंथील खासगी हॉस्पिटलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वागडे येथील 78 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला तर कागल तालुक्यातील व्हन्नाळी येथील 67 वर्षीय महिलेचा शास्त्रीनगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या 1 हजार 754 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 854, नगरपालिका क्षेत्रात 349, कोल्हापूर शहरात 389 तर अन्य 162 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 23 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 935 झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 62 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 1, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 0, करवीर 11, पन्हाळा 1, राधानगरी 0, शाहूवाडी 1, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 5, कोल्हापूर शहरात 27 तर अन्य 16 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात गुरूवारी 1 हजार 354 जणांची तपासणी केली. त्यातील 143 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. कोरोना रूग्ण वाढल्याने सक्रीय रूग्णसंख्या 374 वर पोहोचली आहे.
शहर आणि परिसरात शुटींग सुरू आहे. या शुटींगसाठी आलेल्यापैकी काहींचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी 30 जणांचे कोरोना रिपोर्ट गुरूवारी पॉझिटिव्ह आले. दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्यांनी शुटींग आटोपले असून ते आपापल्या गावी गेले आहेत. त्यामुळे कॉन्ट्रक्ट टेसिंग कसे करायचे, असा प्रश्न आरोग्य विभागासमोर पडला आहे. शुटींग दरम्यान, कलाकार, अन्य सहभागी लोकांचा स्थानिकांशी संपर्क आला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुटींगशी निगडीत असलेल्यांच्या कॉन्ट्रक्ट ट्रेसिंगसाठी महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर, सीबीएनएएटी लॅबमधून गुरूवारी आलेल्या 315 अहवालापैकी 266 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 55 अहवाल आले. त्यातील 54 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 346 रिपोर्ट आले. त्यातील 296 निगेटिव्ह आहेत. जिह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 51 हजार 63 झाले आहेत. त्यापैकी 48 हजार 935 कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 374 रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
शहरात 177 तर ग्रामीणमध्ये 47 होम कोरोंटाईन
शहर आणि परिसरात सध्या 177 कोरोना रूग्णांना होम आयसोलेटेड केले आहे तर ग्रामीण भागात 47 जणांना होम कोरोंटाईन केले आहे. कोरोना रूग्ण मिळालेल्या परिसरात कंटेन्मेंट झोन केले जात आहेत. तसेच आरोग्य विभागाच्यावतीने सर्व्हेही सुरू केला असल्याची माहिती देण्यात आली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









