शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांचे मत
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा आहे. पण जिल्ह्यात कोरोनाची अशी दुसरी लाट दिसून आलेली नाही. नव्याने दैनंदिन येणारी रूग्णसंख्या कमी आहे. तसेच प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे मृत्यूदर रोखण्यात यश आले आहे, अशी माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली. दरम्यान, सीपीआरमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारण्यासाठी 8 कोटी 60 लाख रूपयांच्या निधीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सीपीआरमधील अधिष्ठाता कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. अजित लोकरे, डॉ. मिलिंद सामानगडकर, डॉ. वासंती पाटील, डॉ. गिरीश कांबळे उपस्थित होते.
अधिष्ठाता डॉ. मोरे म्हणाले, शहर आणि परिसरात कोरोनाचे नवे रूग्ण दिसत आहेत. ग्रामीण भागात एखादं दुसरा रूग्ण समोर येत आहे. पण ही कोरोनाची दुसरी लाट नाही. सप्ताहभरात कोरोनाने एखाद्याचा मृत्यू होत आहे. रूग्णसंख्या फार काही जास्त नसल्याने दुसऱया लाटेची शक्यता मावळली आहे. तरीही नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली पाळावी, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी 25 केंद्रे कार्यरत आहेत. लसीकरणाला 100 टक्के प्रतिसाद मिळत आहे. सीपीआरमधील केंद्रांत एकूण 2 हजार 90 जणांनी लस घेतली आहे. यामध्ये 1 हजार 877 जणांनी पहिला तर 213 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ऑनलाईन नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनानंतर सीपीआरमधील सर्व वॉर्ड सुरू झाले आहेत. जास्तीत जास्त नॉन कोरोना रूग्णांवर उपचार, आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया होत आहेत. त्यामुळे जानेवारीपासून आजपर्यत होणाऱया शस्त्रक्रियांत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
सीपीआरमधील कोरोना लसीकरण केंद्र आता तळमजल्यावर
सीपीआर हॉस्पिटलमध्ये कोरोना बाहÎरूग्ण विभाग केसपेपर खिडकीनजीक आहे. कोरोना वॉर्डही जुन्या इमारतीत आहे. पण कोरोना लसीकरण केंद्र कोयना बिल्डींगमधील तिसऱया मजल्यावर आहे. सप्ताहभरापुर्वी व्याधीग्रस्त, ज्येष्ठांना लसीकरण सुरू झाले आहे. पण या केंद्रावर जिने चढताना ज्येष्ठांना त्रास होत होता, त्यामुळे बुधवारी हे लसीकरण केंद्र तळमजल्यावर सुरू करण्यात आले आहे, त्याचा लाभ ज्येष्ठांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिरात गुरूवारी महाशिवरात्री साधेपणाने साजरी होणार आहे. सकाळी अभिषेक, पुजा होणार आहे. त्यानंतर प्रसाद वाटप होणार आहे, अशी माहिती विश्वस्त बबेराव जाधव, आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिली.









