प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात बुधवारी गेल्या 24 तासात कोरोनाचे 48 रूग्ण दिसून आले. दिवसभरात 12 जण कोरोनामुक्त झाले. कोरोना मृत्यूची नोंद निरंक राहिली, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी कोरोना बळी निरंक राहिल्याने बळींची संख्या 1745 झाली आहे. दिवसभरात 12 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 441 झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 48 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 1, कागल 0, करवीर 3, पन्हाळा 1, राधानगरी 1, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 3, कोल्हापूर शहरात 32 तर अन्य 7 जणांचा समावेश आहे. शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर, सीबीएनएएटी लॅबमधून बुधवारी आलेल्या 920 अहवालांपैकी 904 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टच्या 175 अहवाल आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टिंगच्या 315 रिपोर्टपैकी 272 निगेटीव्ह आहेत. जिह्यातील एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 50 हजार 553 आहेत. त्यापैकी 48 हजार 441 कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिह्यात एकूण 367 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.
सक्रीय रूग्णसंख्या 367, कोरोना मृत्यू निरंक
कोरोना रूग्ण – 48 (एकूण : 50553)
कोरोनामुक्त – 12 (एकूण : 48441)
कोरोना मृत्यू – 0 (एकूण मृत्यू : 1745)
सक्रीय रूग्ण – 367









