प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात मंगळवारी गेल्या 24 तासात कोरोनाचे 28 रूग्ण दिसून आले. दिवसभरात 16 जण कोरोनामुक्त झाले. कोरोना मृत्यूची नोंद निरंक राहिली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली. जिल्ह्यात मंगळवारी कोरोना बळी निरंक राहिल्याने कोरोना बळींची संख्या 1745 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागात 852, नगर पालिका क्षेत्रात 349, कोल्हापूर शहरात 386 व अन्य 158 आहेत. दिवसभरात 16 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 429 झाली आहे.
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 40 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 1, चंदगड 0, गडहिंग्लज 2, गगनबावडा 0, हातकणंगले 2, कागल 1, करवीर 2, पन्हाळा 1, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 3, कोल्हापूर शहरात 15 तर अन्य 1 जणांचा समावेश आहे. शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर, सीबीएनएएटी लॅबमधून मंगळवारी आलेल्या 515 अहवालापैकी 481 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टच्या 107 अहवालापैकी 105 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टिंगच्या 245 रिपोर्टपैकी 229 निगेटीव्ह आहेत. जिह्यातील एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 50 हजार 505 आहेत. त्यापैकी 48 हजार 429 कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिह्यात एकूण 331 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.
सक्रीय रूग्णसंख्या 331, कोरोना मृत्यू निरंक
कोरोना रूग्ण ः 28 एकूण ः 50505
कोरोनामुक्त 16 ः एकूण ः 48429
कोरोना मृत्यू ः0 एकूण मृत्यू ः 1745
सक्रीय रूग्ण 331ः









