प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यातसोमवारी कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील वृद्धाचा खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1745 झाली आहे. जिल्ह्यातगेल्या 24 तासात कोरोनाचे 40 नवे रूग्ण दिसून आले. †िदवसभरात 13 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
शहरात सोमवारी कोरोनाने वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1 हजार 745 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागात 852, नगर पालिका क्षेत्रात 349, कोल्हापूर शहरात 386 व अन्य 158 आहेत. दिवसभरात 13 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 413 झाली आहे.
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 40 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 1, चंदगड 1, गडहिंग्लज 1, गगनबावडा 0, हातकणंगले 1, कागल 0, करवीर 3, पन्हाळा 1, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 1, नगरपालिका क्षेत्रात 2, कोल्हापूर शहरात 27 तर अन्य 2 जणांचा समावेश आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी लॅबमधून आलेल्या 136 अहवालापैकी 121 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टच्या 75 अहवालापैकी 74 निगेटिव्ह आहेत. खासगी रुग्णालये, लॅबमध्ये 221 प्राप्त अहवालापैकी 190 निगेटिव्ह आले आहेत. जिह्यातील एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 50 हजार 477 आहेत. त्यापैकी 48 हजार 413 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिह्यात एकूण 319 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
आजअखेर तालुका, नगर पालिका महापालिका क्षेत्रनिहाय रुग्ण संख्या
जिल्ह्यातआजरा 893, भुदरगड 1238, चंदगड 1231, गडहिंग्लज 1517, गगनबावडा 154, हातकणंगले 5331, कागल 1685, करवीर 5744, पन्हाळा 1873, राधानगरी 1254, शाहूवाडी 1364, शिरोळ 2515, नगर पालिका क्षेत्र 7528, महापालिका क्षेत्र 15 हजार 674 असे 48 हजार 1 आणि इतर जिल्हा व राज्यातील 2 हजार 476 असे 50 हजार 477 रुग्णसंख्या आहे.
कोरोना रूग्ण ः 40 एकूण ः 50477
कोरोनामुक्त 13 ः एकूण ः 48413
कोरोना मृत्यू ः 1 एकूण मृत्यू ः 1745
सक्रीय रूग्ण 319 ः









