प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे ४२ नवे रुग्ण आढळून आले. गेल्या २४ तासात ही रुग्ण संख्या दुप्पट वाढल्याने कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
काल, सोमवारी शहरात कोरोनाने एकाचा मृत्यू झाला होता तर १९ नवे रुग्ण आढळून आले होते. यामुळे काल सोमवार पर्यंत जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५० हजार २०६ झाली होती. यात आज आणखी ४२ रुग्णांची वाढ झाल्याने ही संख्या आता ५० हजार २४८ वर पोहचली आहे.









