प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला. सीपीआर हॉस्पिटलमध्ये विक्रमनगर येथील 65 वर्षीय पुरूष आणि शेंडूर निपाणी (बेळगाव) येथील 83 वर्षीय पुरूषाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1 हजार 733 झाली आहे. गेल्या 24 तासांत 15 नवे रूग्ण दिसून आले. त्यातील 10 शहरातील आहेत. दिवसभरात 5 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात शुक्रवारी `सीपीआर’मध्ये शेंडूर आणि विक्रमनगर येथील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोना बळींची संख्या 1733 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागात 850, नगरपालिका क्षेत्रात 348, महापालिका क्षेत्रात 378 तर अन्य 157 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 15 नवे रूग्ण मिळाले. यामध्ये चंदगड 1, गगनबावडा 1, करवीर 1, शाहूवाडी 1, अन्य 1 आणि कोल्हापूर शहरातील 10 रूग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी 5 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 282 झाली आहे. नव्या 15 रूग्णांमुळे कोरोना रूग्णसंख्या 50 हजार 155 झाली आहे.
दरम्यान, शेंडा पार्क येथून आलेल्या 449 रिपोर्टपैकी 441 निगेटिव्ह आहेत. ऍटीजेनचे 48 रिपोर्ट आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 139 रिपोर्ट आले. त्यापैकी 129 निगेटिव्ह आहेत. जिह्यात सध्या 140 सक्रीय रुग्ण आहेत. दिवसभरात 296 जणांची तपासणी केल्याची माहिती डॉ. माळी यांनी दिली.