प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी कोरोना मृत्यूची नोंद निरंक राहिली. तसेच सर्वच तालुक्यांत नव्या रूग्णांची नोंद निरंक राहिली. गेल्या 24 तासांत 19 नवे रूग्ण दिसून आले. तर 18 कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 152 जणांची तपासणी केली. सक्रीय रूग्णसंख्या 35 असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात रविवारी कोरोना मृत्यूची नोंद निरंक राहिली. आजपर्यत केरोनाने 1 हजार 710 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 842, नगरपालिका क्षेत्रात 347, शहरात 368 तर अन्य 153 जणांचा समावेश आहे. सध्या 35 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 152 जणांची तपासणी केली. त्यातील 70 जणांची ऍटीजेन टेस्ट केली.
शेंडा पार्क येथील लॅबमधून रविवारी 1 हजार 55 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 1 हजार 36 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 63 रिपोर्ट आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 72 रिपोर्ट आले, त्यापैकी 62 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 0, करवीर 0, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 0, कोल्हापूर शहर 11 व अन्य 8 असे 19 रूग्ण आहेत. दिवसभरात 18 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 47 हजार 898 झाले. नव्या 19 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 643 झाल्याची माहिती डॉ. माळी यांनी दिली.
Previous Articleउच्च न्यायालयाची बंदी झुगारत येरळा नदीपात्रातील वाळू उपसा सुरुच
Next Article आर्थिक कारणावरुन पत्नी, मुलाकडून एकास चटके









