जिल्ह्यात 13 नवे रूग्ण, 10 कोरोनामुक्त
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात बुधवारी कोरोनाने मृत्यू संख्या निरंक राहिली. गेल्या 24 तासांत 13 नवे रूग्ण दिसून आले. तर 10 कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 281 जणांची तपासणी केली. सध्या सक्रीय रूग्णसंख्या 66 असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात बुधवारी कोरोनाने एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. आजपर्यंत केरोनाने 1 हजार 703 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 840, नगरपालिका क्षेत्रात 347, शहरात 364 तर अन्य 152 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या 63 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 281 जणांची तपासणी केली. त्यातील 153 जणांची ऍंटीजेन टेस्ट केली.
शेंडा पार्क येथील लॅबमधून बुधवारी 805 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 802 निगेटिव्ह आहेत. ऍंटिजेन टेस्टचे 108 रिपोर्ट आले. त्यातील 107 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 121 रिपोर्ट आले, त्यापैकी 111 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 2, गडहिंग्लज 1, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 0, करवीर 0, पन्हाळा 1, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 0, कोल्हापूर शहर 8 व अन्य 1 असे 13 रूग्ण आहेत. दिवसभरात 10 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 47 हजार 750 झाले. नव्या 13 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 519 झाल्याची माहिती डॉ. माळी यांनी दिली.
पॉझिटिव्ह रूग्ण 13, कोरोनामुक्त 10, कोरोना मृत्यू 0
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 49 हजार 519
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 47 हजार 750
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 66
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1703
गेल्या 24 तासांत 281 संशयितांची तपासणी









