प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात मंगळवारी महिलेसह दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाने मृत्यू झालेले करवीर, हातकणंगले तालुक्यातील आहेत. गेल्या 24 तासांत 15 नवे रूग्ण दिसून आले. तर 21 कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 391 जणांची तपासणी केली. सध्या सक्रीय रूग्णसंख्या 63 असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात मंगळवारी हातकणंगले तालुक्यातील संभापूर येथील 65 वर्षीय पुरूष आणि करवीर तालुक्यातील दोनवडे येथील 19 वर्षीय तरूणीचा कोरोनाने मृत्यू झाला. आजपर्यत केरोनाने 1 हजार 703 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 840, नगरपालिका क्षेत्रात 347, शहरात 364 तर अन्य 152 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातसध्या 63 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 391 जणांची तपासणी केली. त्यातील 142 जणांची ऍटीजेन टेस्ट केली.
शेंडा पार्क येथील लॅबमधून मंगळवारी 113 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 95 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 107 रिपोर्ट आले. त्यातील 106 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 117 रिपोर्ट आले, त्यापैकी 107 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 1, गडहिंग्लज 1, गगनबावडा 0, हातकणंगले 1, कागल 0, करवीर 2, पन्हाळा 4, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 0, कोल्हापूर शहर 4 व अन्य 2 असे 15 रूग्ण आहेत. दिवसभरात 21 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 47 हजार 740 झाले. नव्या 15 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 506 झाल्याची माहिती डॉ. माळी यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









