प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी गेल्या 24 तासांत कोरोनाने 28 जणांचा मृत्यू झाला. कोरोना मृत्यूची संख्या सातशेवर पोहोचली आहे. जिल्ह्यात 536 नवे रुग्ण दिसून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 23042 झाली आहे. दिवसभरात 687 रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. त्यामुळे केरोना मुक्ताची संख्या 14 हजार 347 झाली आहे.
जिल्ह्यात रविवारी कोरोनाने 29 जणांचा मृत्यू झाला . यामध्ये एक संशयित आहे. कोरोना मृत्यूची आजपर्यंत आकडेवारी सातशेवर पोहोचली आहे. रविवारी सीपीआरमध्ये शहरातील अंबाई टँक परिसरातील 56 वर्षे पुरुष, कळंबा येथील 70 वर्षीय महिला, राजेंद्रनगर येथील 54 वर्षीय पुरुष, शाहुवाडी माणगाव येथील 65 वर्षे पुरुष, आजरा शिवाजीनगर येथील 50 वर्षे पुरुष, कदमवाडी येथील 70 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
इचलकंरजी येथील आय जी एम हॉस्पिटलमध्ये शहरातील आमराई मळा येथील 69 वर्षीय महिला, अष्टविनायक नगर येथील 50 वर्षीय पुरुष, गावभागातील 69 वषीर्य पुरुष-पुरुष 71 वर्षे पुरुष, कबनूर येथील 65 वर्षीय महिला, कारदगा कर्नाटक येथील 73 वर्षीय पुरुष, शिरोळ टाकवडे येथील 65 वर्षे पुरुष , शहापूर येथील 66 वर्षे पुरुष शिरोळ तालुक्यातील धरणगुट्टी येथील 62 वर्षीय पुरुष, लिगाडे मळा इचलकरंजी येथील 80 वर्षीय पुरुष, पट्टणकडोली येथील 60 वर्षीय महिला, निपाणी बेळगाव येथील 65 वर्षीय महिला, इचलकरंजी येथील 58 वर्षीय पुरुष, आझाद टॉकीज इचलकंरजी येथील 67 वर्षीय पुरुष, कोल्हापूर शहरातील शास्त्रीनगर येथील 65 वर्षीय पुरुष, सांगली बतीस शिराळा येथील 78 वर्षीय पुरुष, राधानगरी सरवडे येथील 66 वर्षीय पुरुष, हुपरी येथील 65 वर्षे पुरुष, शहरातील शिवाजी पेठेतील 40 वर्षीय तरुण आणि नाळे कॉलनी येथील 46 वर्षीय पुरुष आणि करवीर तालुक्यातील पाडळी बुद्रुक येथील 75 वर्षीय पुरुषाचा खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाने ग्रामीण भागात 261, नगरपालिका क्षेत्रात 218, कोल्हापूर शहरात 191 आणि अन्य 29 अशा सातशे जणांचा मृत्यू झालेला आहे. गेल्या 24 तासांत आजरा 3, भूदरगड 5, चंदगड 28, गगनबावडा 2, हातकणंगले 68, कागल 52 , करवीर 47, पंनहाळा 19, राधानगरी दहा, शाहूवाडी 16, शिरोळ46, नगरपालिका 69, कोल्हापूर शहर 165 आणि अन्य सहा असे 536 नवे कोरूना रुग्ण दिसून आले आहेत.
आज पर्यंत कोरोन रुग्णसंख्या 23042 झाली आहे. गेल्या 24 तासांत 687 जण कोरोना मुक्त झाले. त्यामुळे कोरोना मुक्तांची संख्या 14370 झाली आहे. सध्या 7 हजार 936 जण कोरोनावर उपचार घेत आहेत. रविवारी आलेल्या rt-pcr 17 31रिपोर्टमध्ये 1228 निगेटिव आहेत तर 391 पॉझिटिव आहेत. अॉटीजन टेस्टचे 355 रिपोर्ट आले. त्यापैकी 257 निगेटिव तर 98 पॉझिटिव रिपोर्ट आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. केम्पी पाटील यांनी दिली.
Previous Articleअखिल अघांसी तूं हंता
Next Article सामूहिक आरती पडली महागात; गावखडीत 22 जण क्वारंटाईन









