प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. तर मृत्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोल्हापूरकरांच्या चिंतेत भर पडत आहे.
गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात 29 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. तर, 373 जण कोरोना मुक्त झाले आहेत. दरम्यान 735 नव्या बाधित रुग्णांची भर पडली आहे. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकवीस हजारांवर पोहचली आहे. तर, कोरोना मुक्ताची संख्या बारा हजारांवर गेली आहे. कोरोनाने 634 जणांचा मृत्यू झाला आहे.









