प्रतिनिधी / कोल्हापूर
महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेची प्रक्रियेतील पहिला टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. जिल्हा बँकेशी सलग्न असलेल्या 1901 सेवासोसायटय़ांकडील कर्ज खात्यांचे ऑडिट पूर्ण झाले असून 33 हजार शेतकरी कर्जमाफीससाठी पात्र असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. जिल्हा लेखापरिक्षक धनंजय पाटील सोमवारी जिल्हा बँकेला लेखापरिक्षण अहवाल सादर करणार असून त्याच वेळी यादी पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदा थकीत कर्ज खात्यांचे लेखापरिक्षण करण्यात आले. यासाठी जिल्हा विशेष लेखापरिक्षक धनंजय पाटील, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 73 लेखा परिक्षकांनी 1901 सेवासोसायटय़ांकडील थकीत कर्जखात्यांची पडताळणी केली. 13 जानेवारीपासून हे काम सुरु होते. शुक्रवारी लेखापरिक्षण पूर्ण झाले.
सेवासंस्थांची तपासणी सुरु
1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंतच्या कालावधीत वाटप करण्यात आलले व 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकबाकीत असलेले पीक कर्ज खात्यांची तपासणी करण्यात आली. 15 जानेवारीपर्यंत वाटप केलेले कर्ज, मुदतीत पुनर्रगठण कर्जाची तसेच या कर्जावर संबधित बँकांनी आकारणी केलेल्या व्याजाच्या रकमेची पडताळणी करण्यात आली.
अशी झाली तपासणी
–वाटप केलेले कर्ज
–थकबाकी खाती
–थकीत कर्जाची वैयक्तीक खतावणी
–बँकेकडील कर्ज खाते उतारा
–सेवा सोसायटीची उचल क्षमता व केलेली उचल