कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव सुरूच असून आज सायंकाळी सहापर्यंत 94 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. शहरातील साळुंखेनगर येथील महिला आणि हुपरी येथील 52 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 48 वर गेली आहे. तर एकूण कोरोना बाधितांची संख्या दोन हजार 198 वर पोहोचली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. तीन दिवसांत 500 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातच उद्या, दि. 20 जुलैपासून सात दिवसांचा लॉकडाऊन आहे. आज सायंकाळपर्यंतच शंभरच्या घरात कोरोना रुग्ण वाढले आहेत. तरीही आज दिवसभरात कोल्हापूर शहरातील रस्त्यांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे ही बाब प्रशासन आणि नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारी आहे.
Previous Articleपंतप्रधान मोदींच्या ट्विटर फॉलोअर्सने पार केली 6 कोटींची संख्या
Next Article राज्यात यापुढे एसएमएसद्वारे मिळणार निगेटिव्ह अहवाल








