प्रतिनिधी / कोल्हापूर
आज दिवसभरात शहरात आणखी नवीन तीन रुग्ण आढळले असून यामध्ये इचलकरंजीचे दोन तर चंदगडच्या एकाचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८०० इतकी झाली आहे. आज दिवसभरात एक रुग्ण कोरानामुक्त झाला असून आजपर्यंत ७१३ रुग्ण कोरानामुक्त झाले आहेत. तर ७० रुग्ण उपचार घेत आहेत.








