शेतकऱ्यांची तारांबळ, पिकाचे नुकसान होण्याची शक्यता
प्रतिनिधी / कोल्हापूर
दिवसभरात उन्हाचा तडाखा असतानाच सायंकाळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. अचानक बरसलेल्या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. हातकणंगले, गडहिंग्लज आदी विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पावसाने तुरळक स्वरूपात हजेरी लावली. तर काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उष्णतेने लाही-लाही होत असताना पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
बहुतांश ठिकाणी ज्वारीची मळणी व कापणी सुरू आहे. शेतकऱ्यांची ज्वारी कापून शेतामध्ये पडलेली आहे. तर अनेकांनी ज्वारीची मळणी करण्यासाठी कणसे खुडून घातले आहेत. तर अनेकांनी ज्वारी वाळ .वण्यासाठी पसरली होती तर हरभऱ्याची ही गंजा घालण्यात आल्या आहेत. आज, अचानक मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Previous Articleसातारा : दिवसा ढवळय़ा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वीजेची चोरी
Next Article आई कुठे काय करते‘ मालिकेत नवं वळण









