सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली माहिती
प्रतिनिधी / जयसिंगपूर
कोल्हापूर शहराच्या धर्तीवर जिल्ह्यातील इतर सर्व ठिकाणचे व्यवसाय शासनाच्या अटीस अधीन राहून शुक्रवार दि. ९ जूलै पासून सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला दिले असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.
ज्या विभागामध्ये बाधित रुग्णांची संख्या कमी आहे अशा जिल्ह्यातील सर्व शहरे आणि गावांमधील छोटे-मोठे व्यवसाय सुरू व्हावेत यासाठी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन आज सकाळीच मागणी केली होती.
राज्यमंत्री यड्रावकर यांनी केलेल्या या प्रयत्नाला यश आले असून शुक्रवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय उद्योग सुरू करण्यास मुभा मिळणार आहे.








