प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात रविवारी हातकणंगले तालुक्यातील रूकडी येथील 27 वर्षीय तरूणाचा कोरोनाने मृत्यू झाला. दिवसभरात 32 जण कोरोनामुक्त झाले तर 46 नवे रूग्ण दिसून आले. सध्या जिल्हÎात 982 रूग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 238 जणांची तपासणी करण्यात आली, रविवारी सहा तालुक्यांत एकही नवीन रूग्ण नोंद नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात रविवारी सक्रीय रूग्णसंख्या 982 आहे. कोरोनाने एका तरूणाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1 हजार 643 झाली आहे. गेल्या 24 तासांत 6 नवे रूग्ण दिसून आले तर 32 कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 45 हजार 564 झाली. पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 48 हजार 189 झाली आहे. दिवसभरात 238 जणांची तपासणी केली आहे. त्यातील 56 जणांची अँटीजेन टेस्ट केली आहे. शेंडा पार्क येथील लॅबमधून 820 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 775 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 56 रिपोर्ट आले. त्यापैकी 54 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत 32 कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 45 हजार 564 झाली आहे. जिल्हÎात आजरा, भुदरगड, गडहिंग्लज, कागल, पन्हाळा, राधानगरी तालुक्यात रविवारी एकाही नव्या रूग्णांची नोंद झालेली नाही. चंदगड 3, गगनबावडा 1, हातकणंगले 5, करवीर 7, शाहूवाडी 3, शिरोळ 5, नगरपालिका क्षेत्रात 12, कोल्हापूर शहर 10 असे 546 रूग्ण असल्याची माहिती डॉ. अनील माळी यांनी दिली.









