http://mahapolicerc.mahaitexam.in/ या संकेतस्थळावरुन देखील प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाई पदाकरीता शनिवार 23 रोजी लेखी परीक्षा होत आहे. शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर सकाळी दहा ते साडे अकरा यावेळेत परीक्षा होईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली. जिल्हा पोलीस दलातील आस्थापनेवरील एकूण 78 पोलीस शिपाई रिक्त पदांसाठी पोलीस भरतीकरीता सन 2019 मध्ये जाहिरात देण्यात आलेली होती. त्यापैकी 75 पोलीस शिपाई पदाकरीता आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची लेखी शहरातील विविध परिक्षा केंद्रावर होत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र त्यांच्या ई-मेलवर बुधवार 20 ऑक्टोबर रोजी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
तसेच http://mahapolicerc.mahaitexam.in/ या संकेतस्थळावरुन देखील प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर दोन तास अगोदर हजर राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी लेखी परीक्षेकरीता ओळखपत्रावर नमूद असलेल्या परीक्षाकेंद्रावर ओळखपत्रासह वेळेत उपस्थित रहावे. ओळखपत्र प्राप्त होण्याबाबत काही अडचणी असल्यास मदतीसाठी 9699792230, 8999783728, 9309868270, 9423162395, कोल्हापूर पोलीस नियंत्रण कक्ष :- 0231-2656711/2601950 या दूरध्वनी, मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी केले आहे.








