म्युकर रूग्णांची संख्या 180 वर
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी म्युकर मायकोसीसने सीपीआर हॉस्पिटलमध्ये दोघांचा मृत्यू झाला तर 7 नवे रूग्ण दिसून आले. आजपर्यत म्युकर रूग्णांची संख्या 180 इतकी नोंद झाली आहे.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये म्युकरचे 5 रूग्ण दाखल झाले. शहरात खासगी हॉस्पिटलमध्ये 2 रूग्ण दाखल झाले. म्युकरने दोघांचा मृत्यू झाल्याने म्युकर बळींची संख्या 24 वर पोहोचली आहे. सीपीआरमध्ये 115 तर खासगी हॉस्पिटलमध्ये 55 जण तर अन्य ठिकाणी 10 जण उपचार घेत आहेत. एकूण 180 रूग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 22 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती सीपीआरमधून देण्यात आली.









