न्याय नगरी क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत
प्रतिनिधी / कोल्हापूर
कसबा बावडा येथील जिल्हा सत्र न्यायालयात कोरोनाने एंट्री केली असून, काही न्यायाधीश व काही न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे न्याय नगरी क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषणा केलेची माहिती सुत्राकडून समजते.
कोरोनाने जिल्हा सत्र न्यायालयात शिरकाव केलेला असून, काही न्यायाधीश व काही न्यायालयीन कर्मचारी बाधित झाले आहेत. त्यामुळे न्यायालयात वकीलांनी शक्यतो येणे टाळावे. सदरचे संकट दूर होईपर्यंत न्यायालयीन कामकाजपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हाबार असोसिएशनचे अध्यक्षांनी केले आहे. तसेच याविषयी उच्च न्यायालयाकडून पुढील सूचना येण्याची अपेक्षा असून, त्या सुचना येताच सर्व वकीलांना कळविणेत येईल. तरी सर्व वकीलांनी घरीच राहून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी असेही आवाहन जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. रणजीत गावडे यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









