प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुक्यातील 149 मतदार असून यापैकी एकशे दहा ठरावधारक मतदार आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे मला निवडणुकीची चिंता नाही मीच नाही. मी स्वतः निवडणूक लढवणार आहे. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अनेक विकासाची कामे केली आहेत. क्षारपड जमीन मुक्तीसाठी अल्पदरात कर्ज पुरवठा यासह अन्य योजना राबवल्या आहेत. तालुक्यातील सेवा सोसायटीचे एकशे दहा मतदार आपल्या पाठीशी असल्याचा दावा राज्याचे आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केला. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ पॅनेलमध्ये असणार आहेत. आम्ही तिघे मिळून पॅनलची घोषणा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
येथील बाळासाहेब लडगे यांनी एल मार्टचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त मंत्री यड्रावकर आले होते. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेतली असता त्यांनी ही माहिती दिली.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिरोळ तालुका सर्वपक्षीय समितीच्या वतीने श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरीही दोन्ही उमेदवार तालुक्यातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपली भूमिका सांगून मतदान करण्याची विनंती करीत आहेत.
नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर ही निवडणूक लढवणार की नाही याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती त्यांनी निवडणूक लढवणार त्याचे स्पष्ट केल्याने कार्यकर्ते व मतदारांची संभ्रमावस्था दूर झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









