सुरेश पाटील / पुलाची शिरोली
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी हातकणंगले तालुक्यातून एक नव्हे तब्बल सहा उमेदवारांना सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप ,जनसुराज्य शक्ती व मिञपक्षांच्या पॅनेलमधून उमेदवारी निश्चित झाली आहे. यापैकी विकास सेवा सोसायटी गटातून माजी आमदार अमल महाडिक पुलाची शिरोली यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सहा जणांना उमेदवारी मिळाली आहे.
यामध्ये पतसंस्था गटातून आमदार प्रकाश आवाडे( इचलकरंजी) महिला गटातून माजी खासदार श्रीमती निवेदिता माने (रुकडी), मागासवर्गीय गटातून आमदार राजूबाबा आवळे (कोरोची), प्रक्रिया गटातून मदन कारंडे( इचलकरंजी) ओबीसी गटातून विजयसिंह माने (अंबप) आदी उमेदवार सत्ताधारी गटातून निवडणुकीत सामोरे जात आहेत.
यापूर्वी माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजूबाबा आवळे व माजी खासदार श्रीमती निवेदिता माने आदी चार जणांनी प्रतिनिधींत्व केले आहे. पण होवू घातलेल्या निवडणुकीत दोघांची भर पडली आहे.