प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा बँकेचा स्थगित झालेला निवडणूक कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होणार आहे. मे 2020 मध्ये जिल्हा बँकेची निवडणूक होणार होती. परंतु, कोरोनाचे संकट असल्याने निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली होती. कोरोना संकटामुळे गेल्या पावणे दोन वर्षांत ही निवडणूक झाली नव्हती. आता सहकार विभागाने निवडणूक कार्यक्रम सुरू करण्याचे निर्देश दिल्याने लवकरच निवडणूक होणार आहे.
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडू लागल्याने सरकारने 31 ऑगस्ट पर्यंत निवडणुकीला स्थगिती दिली होती.
Previous Article‘स्पुतनिक-व्ही’चा 20 दिवसांपासून तुटवडा
Next Article इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीचा पदग्रहण सोहळा उत्साहात









