प्रतिनिधी / कोल्हापूर
महिला पदाधिकाऱयासोबत गैरवर्तन केल्याप्रकरण जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते विजय भोजे (वय 45) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा शाहुपूरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. संबंधीत महिलेने याबाबतची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक कटकधोंड यांनी दिली.
संबंधीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, विजय भोजे यांनी ऑक्टोंबर 2019 मध्ये संबंधीत महिलेकडे दिवाळीची मागणी केली. तसेच दिवाळी घरी घेवून येण्यास फोनकरुन सांगितले. यानुसार संबंधीत महिला तिच्या मुलीसोबत भोजे यांच्या घरी गेली. यावेळी भोजे यांनी संबंधीत महिलेस लज्ज उत्पन्न होईल असे वर्तन केले. यानंतर त्याचदिवशी रात्री भोजे यांनी त्या महिलेस फोनकरुन घरी येण्यास सांगितले. तसेच त्यांना लज्ज उत्पन्न होईल असे मॅसेज पाठविले. त्या महिलेनी या घटनेची माहिती जिल्हापरीषदेच्या अध्यक्षांना दिली. अध्यक्षांनी समजूत काढल्यामुळे या प्रकरणी कोणतीही तक्रार देण्यात आली नाही. मात्र भोजे यांनी यानंतर कुस्ती मॅटच्या प्रकरणावरुन जाणीवपुर्वक त्रास देण्यास सुरुवात केली. यास कंटाळून संबंधीत महिलेने भोजे यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.









