प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये दिवसेंदिवस गोंधळ, बाचाबाची, राड्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. सर्वसाधारण सभेचे तर राजकीय रणांगणच झाले आहे. असाच प्रकार आज देखील घडला. हातकणंगले पंचायत समिती सदस्य प्रवीण वसंत जनगोंडा आणि सहकारी यांनी तर चक्क आज अर्धनग्न आंदोलनच केले.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाची चौकशी करावी यासाठी हातकणले पंचायत समिती सदस्य प्रवीण वसंत जनगोंडा आणि सहकारी यांनी हे अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी जिल्हा जिल्हा परिषद सीईओ यांच्या दालनासमोर पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये जोरदार झटापट देखील झाली.









