कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून गुरुवारी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आला आहे. समाजकल्याण अधिकारी आणि महिला बालकल्याण विभागातील अधिक्षकांनंतर ग्रामपंचायत विभागात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे जिल्हापरिषदेत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्याभरात जिल्हापरिषदेतील नऊ जणांना कोरोनांची लागण झाली आहे. जिल्हा परिषदेत दिवसेंदिवस कोरोना बधितांची संख्या वाढत असल्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवण्यासाठी जिल्हापरिषदेचे कामकाज 50 टक्के कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. स्वच्छतेसह सर्व आवश्यक काळजी घेतली जात असतानाही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होताना दिसत आहे. यापूर्वी ग्रामसडक विभागमधील महिला कर्मचारी, उपाध्यक्ष, त्यांचेस्वीय सहायक, चालक, ग्रामिण पाणीपुरवठा विभागातील कक्ष अधिकारी आणि ग्रामपंचायत विभागमधील ग्रामसेवक अशा एकूण सहा जणांना कोरोना संसर्ग झाला होता. आता ही संख्या नऊवर पोहोचली आहे. ग्रामपंचायत विभागाशी जिल्ह्यातील अनेक ग्रामसेवक संपर्कात आले आहेत.आता अधिकारीच पॉझीटिव्ह आल्यामुळे संपर्कात आलेल्या ग्रामसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.
Previous Articleसांगली : पाच जणांचा मृत्यू, 168 रूग्ण वाढले
Next Article दुसऱया मजल्यावरुन पडून हिंडलगा येथील तरुणाचा मृत्यू








