प्रतिनिधी/वारणानगर
कोल्हापूर जिल्हा रेडझोनमध्ये नाही, पन्नास व्यक्तीना सामाजिक अतंर ठेवून एकत्र येण्याची शासन मान्यता असताना जिल्हा परिषदेने मंगळवार दि. १६ रोजी होणारी सर्वसाधारण सभा सदस्याच्या उपस्थितीत घेण्याऐवजी प्रशासनाने व्हीसीद्वारे (व्हीडीओ कॉन्फरन्स) द्वारे आयोजीत केलेल्या सभेस जनसुराज्य शक्ती पक्षाने आक्षेप घेतला असून जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला आपतकालीन निधी मनमानीपणे खर्च करता यावा यासाठी हा व्हीसीद्वारे सभेचा डाव रचल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे यानी पत्रकार परिषदेत केला.
वारणानगर ता. पन्हाळा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या आक्षेपा बाबत सदस्य शिवाजीराव मोरे बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल सह पदाधिकारी यांना सर्व साधारण सभा महत्वाचा भाग आहे. यासाठी सदस्य उपस्थित असणे गरजेचे आहे. तथापी कोरोनामुळे व सामाजिक अतंराचे भान ठेवत या सभेला सर्वच पक्षाच्या गटप्रमुखानी सभेसाठी आपले मर्यादीत सदस्य पाठवून सर्वसाधारण सभा घ्यावी अशी सूचना आपण मांडली होती. त्याला बगल देत प्रशासनाने व्हीसीद्वारे ते ही सभागृहात न येता तालुक्याच्या ठिकाणा वरून आयोजीत केलेल्या सभेने योग्य न्याय मिळणार नसल्याचे मोरे यानी सांगीतले.
जिल्हा परिषदेला आपतकालीन निधी ३५ कोटी रूपये प्राप्त झाला आहे हा निधी मान्यतेशिवाय तसेच टेंडर प्रक्रिया न करता हा निधी खर्च करता येत असल्याने हा निधी मनमानी करून खर्च केला जाईल सभेला उपस्थित राहून सदस्य आपतकालीन खर्चाला नियम लावतील यासाठीच व्हीसी द्वारे सभा आयोजीत केली आहे तसेच कोरोनामुळे अनेक विकास कामांचे प्रश्न प्रलंबीत आहेत त्यास आज होणाऱ्या सभेत मार्ग मिळाला असता परंतु प्रशासनाने या सभेला वेगळे वळण लावले असल्याचे सांगीतले.
Previous Articleडोंबिवली मिलापनगर मध्ये घरफोडीचे सत्र
Next Article मायक्रोसॉफ्टकडून रोजगाराच्या संधी








