शहरात दिवसभरात 119 पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हय़ात कोरोनाने शनिवारी सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळेची संख्या 187 वर पोहोचली आहे. जिल्हय़ात रात्रीपर्यत 263 पॉझिटिव्ह रूग्ण दिसून आले. यामध्ये कोल्हापूर शहरातील 119 रूग्णांचा समावेश आहे. शहरातील टिंबर मार्केट, वारे वसाहत, जवाहरनगर आणि ताराबाई पार्क हे कोरोना हॉटस्पॉट झाले आहेत. सोमवारपासून जिल्हय़ात अँटीजेन टेस्टची संख्या वाढणार आहे. त्यामुळे पॉजिटिव्ह रूग्णसंख्याही वाढली आहे. दरम्यान, दिवसभरात 126 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 2 हजार 862 झाली आहे तर पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 6 हजार 443 झाली आहे.
जिल्हय़ात तीन महिन्यात 50 हजार जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आता खासगी लॅबद्वारेही कोरोना तपासणी सुरू आहे. टेस्टिंग किटमुळे थांबलेली स्वॅब तपासणी शनिवारी दुपारी सुरू झाली आहे. त्यानंतर रात्रीपर्यत 118 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह रिपोर्ट आले. शहरातील 65 वर्षीय वृद्धाचा रात्री उशिरा मृत्यू झाला. तो शुक्रवारी दाखल झाला होता.शुक्रवारी रात्री निगवे दुमाला येथील 50 वर्षीय महिला, शनिवार पेठेतील 60 वर्षीय पुरूष आणि कुंरूंदवाड येथील 80 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
दरम्यान, शनिवारी शहरातील शहाजी वसाहत येथील 66 वर्षीय वृद्धेचा शास्त्रीनगर येथील खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. यादवनगर येथील 68 वर्षीय वृद्धाचा त्याच्या घरी मृत्यू झाला. गांधीनगर येथील 71 वर्षीय वृद्धेचा कोल्हापुरातील खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. पहाटे बेळगाव येथील 52 वर्षीय पुरूषाचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. तीन दिवसांपुर्वी तो दाखल झाला होता. तो कोरोना पॉझिटिव्ह होता. शिरोळ येथील 33 वर्षीय पुरूषाचा कोरोनाने पहाटे मृत्यू झाला. तो 24 रोजी उपचारार्थ सीपीआरमध्ये दाखल झाला होता. शिरोळ येथील 65 वर्षीय वृद्धाचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. दरम्यान, कोल्हापूर शहरातील बळींची संख्या 39 झाली आहे.
जिल्हय़ात गेल्या 24 तासांत 263 पॉझिटिव्ह रूग्ण झाले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 6 हजार 443 झाली आहे. शहरात 119 पॉझिटिव्ह रूग्ण असून आजपर्यत 1 हजार 744 पॉझिटिव्ह रूग्ण झाले आहेत. ग्रामीण भागात 144 पॉझिटिव्ह रूग्ण झाले आहेत. यामध्ये आजरा 11, भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, शाहूवाडी प्रत्येकी 1, हातकणंगले 17, कागल 4, करवीर 43, पन्हाळा, राधानगरी प्रत्येकी 6, शिरोळ तालुका 5 यांचा समावेश आहे. अन्य जिल्हय़ातील 18 आहेत. दिवसभरात 126 जणांना डिसचार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 2 हजार 862 झाली आहे.
शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यत 843 स्वॅब रिपोर्ट आले. त्यामध्ये 527 निगेटिव्ह आले असून 263 पॉझिटिव्ह आले आहेत. 51 रिपोर्ट प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत 3 हजार 394 रूग्ण उपचार घेत असल्याचे








