भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे सरकारला प्रतिआव्हान
प्रतिनिधी / कोल्हापूर:
दर वेळी उठून धमक्या देण्याचे कारण नाही, झोपलेल्या सरकारने जलयुक्त शिवार योजनेची खुशाल चौकशी करावी, शेतकऱयांच्या बांधावर जावून चौकशी करा सत्य समोर येईल असे प्रतिआव्हान भारतीय जनाता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केले.
कॅगच्या अहवालात तासेरे ओढल्याने राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली. यावर पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले. राज्यातील 22 हजार 585 गावात 6 लाख 41 हजार 560 कामे झाली आहेत. त्यापैकी कॅगने 130 गावातील 1128 कामे तपासली ही एकुण कामाच्या 1 टक्केच तपासणी झाली आहे. त्यावरुन गैरव्यवहार झाला असा अर्थ काढणे चुकीचे आहे. चौकशीच करायची असेल तर घरातून बाहेर पडा, गावागावात जावून शेतकऱयांशी बोला, शेतकऱयांनी म्हटले पाहिजे भ्रष्टाचार झाला. तर त्याला अर्थ आहे. एखाद्या गावातील एकात जरी भ्रष्टाचार झाला असेल तर स्थनिक अधिकारी जबाबदार असतील. सरकारला जबाबदार कसे धरता असा सवाल उपस्थित केला. गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही त्यांनी तिकट शब्दात समाचार घेतला ते म्हणाले, चौकशी लाववतो, करतो अशी वारंवार धमकी कशाला देता ही काय मोगलाई आहे का, देशमुख तुम्हाला आडवलयं कुणी असा सवाल केला. जलयुक्त शिवारला लोकचळीचे स्वरुप होते. ती चळवळच आत या सरकारने बंद केली आहे. असा आरोपही त्यांनी केला. यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.









