प्रतिनिधी/जयसिंगपूर
येथील नगराध्यक्षांनाच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दोन दिवसापूर्वी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. आज, मंगळवारी दुपारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये उपचार सुरु आहेत.
तर, सध्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 102 वर पोहोचली असून त्यातील चार मयत आहेत. 15 पंधरा जण कोरोनामुक्त झालेले असून उर्वरित रुग्णांच्या वर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. शहरातील दैनंदिन जीवन सुस्थितीत येत असले तरी रुग्णांची संख्या दिवसागणित वाढत आहे. पालिका प्रशासन व आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात तत्पर असून नागरिकांनीही ही काळजीने रहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे








