प्रतिनिधी / गगनबावडा
गेल्याच आठवड्यात पडलेल्या धो – धो पावसाच्या काळात बंधाऱ्यावरील भराव वाहून गेल्याने मोठे भगदाड पडले आहे. शेजारील ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. येथील वाहतूक ठप्प झाली आहे.
गगनबावडा व राधानगरी या दोन तालुक्यांना जोडणारा धामणी नदीवरील चौधरवाडी – म्हासूर्ली दरम्यानचा बंधारा महत्त्वाचा आहे. मात्र गेल्याच आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने दोन्ही बाजूकडील भराव वाहून गेला आहे. ऊत्तरेकडील रंगराव चौधरी यांच्या मालकीच्या ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे २० गुंटे क्षेत्रातील जमिनीची धूप झाली आहे. पाण्याच्या वेगाने बाजूची शेती वाहून मोठे नुकसान झाले आहे. पाटबंधारे विभागाने तटबंदी भिंत बांधली आहे.
पण दोन वर्षांपासून तिचे बांधकाम अर्ध्यावरच रखडले आहे. दरवेळी या शेतीस मोठा फटका बसत आहे. पाटबंधारे विभागाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून कार्यवाही करावी,अन्यता तिव्र आंदोलन करण्याचा इशारा रंगराव चौधरी, महीपती चौधरी या शेतकऱ्यांनी दिला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









