वार्ताहर / उचगांव
समाज मंदिर व संस्कृतिक सभागृहाच्या प्रवेशाच्या कारणावरून चिंचवाड (ता. करवीर) येथे पोवार व घाटगे गटात काट्या, कुऱ्हाड, लोखंडी बार, तलवार व दगडाने एकमेकांच्या घरात घुसून झालेल्या हाणामारीत घाटगे गटाचे 9 जन तर पोवार गटाचे दहा जण जखमी झाले. याबाबत परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून पोवार गटाच्या 21 जणांवर गुन्हा दाखल केला असून 14 जणांना अटक करण्यात आली आहे. तर घाटगे गटाच्या 12 जणांवर गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक केली आहे. हा प्रकार रविवारी रात्री उशिरा झाला असून नोंद सोमवारी झाली. या प्रकारामुळे संपूर्ण चिंचवाड गावात भितीचे वातावरण पसरले.
पोवार गटाचे गुन्हा दाखल झालेले आरोपी असे : निखिल सावंत पोवार, प्रमोद बाबासो पोवार, राहुल गुंडाप्पा पोवार, अभिजीत तानाजी पोवार, उत्तम भाऊ पोवार, अमर दगडू पोवार, सावंता राजाराम पोवार, लखन सुरेश पोवार, आकाश अनिल पोवार, रमेश भिमराव पोवार, रमेश दत्तात्रय पोवार, अमोल सुरेश पोवार, सुशांत बाळू पोवार, छाया बाबासो पोवार, संगीता सुनिल पोवार, बेबीताई शिवाजी पोवार, संगीता अनिल पोवार, बाळाबाई सुरेश पोवार, विमल सावंता पोवार, मयूर प्रकाश गवळी, कल्पना प्रकाश गवळी (सर्व रा. पोवार गल्ली, चिंचवाड). यापैकी पोवार गटाच्या अनुक्रमे 14 जणांना अटक करण्यात आली. घाटगे गटाचे गुन्हा दाखल झालेले आरोपी असे : प्रकाश वसंत घाटगे, दीपक वसंत घाटगे, सुनील श्रीकांत घाटगे, अभिषेक सूनील देवकुळे, प्रेम दीपक घाटगे, सुहास श्रीकांत घाटगे, वसंत बापू घाटगे, श्रीकांत बापू घाटगे, कल्पना वसंत घाटगे, सविता दीपक घाटगे, निशा सुनील घाटगे, अंजली सुहास घाटगे ( सर्व रा, घाटगे गल्ली, चिंचवाड). घाटगे गटाच्या प्रकाश वसंत घाटगे, सुनील श्रीकांत घाटगे, अभिषेक सुनील देवकुळे, प्रेम दीपक घाटगे, सुहास श्रीकांत घाटगे अशा पाच जनाना अटक केली आहे.
घाटगे गटाच्या कल्पना वसंत घाटगे यांनी, तर पोवार गटाच्या उत्तम भाऊ पोवार यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. दोन्ही गटाच्या मिळून 33 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 19 जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
Previous Articleसांगली : शिवानंद स्वामींच्या उपोषणास पाठिंबा
Next Article कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 20 बळी, 781 पॉझिटिव्ह








