चंदूर / वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील चंदुर गावात दिवसेंदिवस कोरोणाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे गाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. अशा परिस्थितीत गावातील 3 व्यक्तींचा मृत्यूही झाला आहे. तरीही या परिस्थितीचे गांभीर्य चंदुर ग्रामपंचायतीला समजत नसल्याचे दिसते, कारण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेले पॉझिटिव्ह रुग्ण गावात येऊन राजरोसपणे फिरून परत हॉस्पिटल जात आहेत. गावात कित्येक ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर संबंधित परिसर सील केला जात नाही व त्या परिसराचे निर्जंतुकीकरण केले जात नसल्याची तक्रार नागरिकांतून येत आहे.
पंचगंगा नदीचे पाणी गावातील नागरी वस्तीत येऊन गेल्याने त्या ठिकाणच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नदीतील कचरा साठला आहे व तो कचरा कुजून त्याची दुर्गंधी पसरत आहे. आज चंदुर मधील कोरोनो पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 76 वर गेली आहे. त्यातील 38 जण बरे होऊन घरी आले असून दवाखान्यात 34 जण उपचार घेत आहेत. तर घरी एकजण उपचार घेत आहे. आत्तापर्यंत एकूण तीन जण मयत झाले आहेत तर अजून 15 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









