वार्ताहर/कोवाड
ढोलगरवाडी ता.चंदगड परीसरात मध्यरात्री ढगफूटी पाऊस झाल्याने ढोलगरवाडी परीसर हादरून गेला. मध्यरात्री 2.30 च्या दरम्यान अचानक पाऊसाला सुरवात झाली. गावकरी गाढ झोपेत होते. मात्र पाऊसाचा रुद्रावतार पाहून ढोलगरवाडीसह परीसरातील ग्रामस्थांची झोपच उडाली. ढोलगरवाडी कडलगे गावच्या मध्ये असलेल्या लेंढी ओढ्यावर सकाळ पर्यंत चार फूट पाणी होते. या भयंकर पाण्याने ढोलगरवाडी कडील बाजूच्या रस्त्याचे तीन तेरा झाले आहेत. त्यामूळे अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. ढगफूटीच्या पाऊसाने भात, ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कडलगे, सुंडी, करेकुंडी, नागरदळे, किणी, कोवाड परीसरात ही रात्री पाऊसाने कहर केला होता.
दरम्यान ढोलगरवाडी कडलगे रस्त्यावरील असलेल्या लेंढी ओढ्यावरील मोरी असून अडचण अन् नसून खोळंबा झाली आहे. दोन्ही गावच्या बाजूंनी रस्ता उंच आणी मोरी खाली खूपच तळात आहे. यामळे शालेय विद्याथ्र्यांचे शैक्षणीक नूकसान सातत्याने होत असते.कडलगे गावतील मुले मुली ढोलगरवाडी येथे शाळा कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जातात. पाऊसाळ्यात मोरीवर पाणी आले की विद्यार्थी घरी पोहचे पर्यंत शाळेतील शिक्षक आणी घरी पालक चिंतेत असतात. या ओढयावरील मोरीची उंची वाढविण्यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली आहेत.शासन दरबारी सातत्याने पाठपूरावा झाला आहे परंतू शासनाला मोठी दुर्घटना झाल्यावरच जाग येणार का ? असा संतप्त सवाल परीसरातील ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.









