निटूरच्या एका वृद्धाचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या ५२२ वर
प्रतिनिधी/चंदगड
चंदगड तालुक्यात कोरोनाने कहर केला असून गेल्या चोवीस तासात नव्या १४ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर निटूरच्या एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. यामुळे तालुक्यातील मृतांची संख्या १५ तर एकूण रुग्णसंख्या ५२२ झाली आहे.
गेल्या चोवीस तासात गुडेवाडी ३, आमरोळी ३, ढोलगरवाडी २, चंदगड १, तडशिनहाळ १, सातवणे १, पार्ले १, शिरगाव १ आणि नागरदळे येथे १ असे नवे १४ रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील मुख्य हॉटस्पॉट असलेल्या तांबुळवाडीत कोरोना शंभर टक्के नियंत्रणात आला असून आता चंदगड शहरात रुग्णसंख्या वाढत आहे. चंदगड शहराची रुग्णसंख्या आता ३० झाली आहे. तालुक्यात समूह संसर्ग सुरु असून तपासणीसाठी आलेल्या स्वॅबपैकी चाळीस टक्के स्वॅब पॉझिटिव्ह येत आहेत. मृतांचा आकडाही दिवसागणिक वाढत आहे. ऑक्सिजन-व्हेंटीलेटरची सुविधा तातडीने चंदगड येथे निर्माण करण्याची गरज कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीने अधोरेखित केली आहे.
Previous Articleमुरगूडातील महिला बेपत्ता
Next Article सांगली : चोरीच्या १६ मोटर सायकली जप्त, एकास अटक









