वार्ताहर / यड्राव
तलवारी व जांबिया या घातक शस्त्रांची विक्री करणे करता आलेल्या दोघांना शहापूर पोलीसानी अतिशय शिताफीने ताब्यात घेतले. प्रदीप दिलीप रावळ वय वर्षे 20 व प्रवीण दिलीप रावळ वय वर्षे 30 दोघेही राहणार नदीवेस, मठ गल्ली गडहिंलज अशी दोघा संशयितांची नावे असून त्यांच्याकडून दोन तलवारी व दोन जांबिया या घातक शस्त्रा सह हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल असा 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद यादव यांना त्यांच्या खास बातमीदार यामार्फत हॉटेल प्रतिनिधी बियर बार जवळ दोन इसम त्यांच्या कडील काळ्यानिळ्या रंगाच्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल घेऊन विनापरवाना बेकायदेशीरपणे हत्यारे बाळगून संशयितरित्या थांबले असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रसाद यादव यांनी पोलीस पथकास मिळालेले माहिती कळवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक गणेश खराडे पोलीस हवालदार महेश कोरे, साजिद कुरणे, मंजर लाटकर, अमित भोरे व अर्जुन फातले यांच्या पथकाने सापळा रचून अतिशय शिताफीने छापा टाकून प्रदीप रावळ व प्रवीण रावळ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील घातक शस्त्रे व मोटारसायकल जप्त केली घातक शस्त्र बाबत यांच्याकडे विचारणा केली असता ही शस्त्र विक्री करण्याकरता आणली असल्याचे सांगितले हे घातक शस्त्र नेमके कोणाला विकण्यासाठी आणली होती. तसेच हि शस्त्रे कोणाकडून आणली त्याची माहिती तपासात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.









