वार्ताहर/प्रयाग चिखली
करवीर तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रयाग येथील पुजारी समाधान गिरी यांचे घरावर येथील पिंपळाचे झाड पडल्याने पुजारी गिरी यांच्यासह पाचजण जखमी झाले. ही घटना काल, गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास वादळी पाऊसादरम्यान घडली. तर गिरी यांचे घरासह कार्तिक स्वामी मंदिर गिरी बुवा समाधी मंदिराचेही मोठे नुकसान झाले आहे.
यात पुजारी समाधान गिरी त्यांची पत्नी शीतल, मुलगी- स्वरा, बहिण नकुशा, प्रतिक अशी जखमीची नावे आहेत. त्यांच्यावर वरणगे पाडळी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.