मंदिरात पुजेची तयारी करतानाच ह्लदयविकाराच्या झटक्याने निधन
प्रतिनिधी / सरवडे
मोठ्या भक्तीभावात घटस्थापनेने व देवीच्या प्रतिष्ठापनेने सर्वत्र नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. घरोघरी घटस्थापना करण्यात आली. यातच कोल्हापुरात एक दुर्देवी घटना घडली. मंदिरात पुजेची तयारी करीत असतानाच एका पुजाऱ्याचा ह्लदयविकाराच्या झटक्याने दुर्देवी मृत्यू झाला. कागल तालुक्यातील बोरवडे येथे ही घटना घडली. जोतिराम शामराव गुरव (वय-४२) असे या मृत पुजाऱ्याचे नाव आहे. नवरात्र उत्सवातील घटस्थापनेच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने बोरवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मयत गुरव हे गावातील ग्रामदैवत जोतिर्लिंग मंदीरात पुजाअर्चा करीत होते. आज घटस्थापना असल्याने सकाळी ते मंदिरात पुजेची तयारी करत होते. यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने, स्थानिक डॉक्टरांकडून तपासणी करुन मुधाळ तिट्टा येथील खासगी दवाखान्यात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू उपचारापूर्वीच त्यांचे ह्लदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जोतिराम हे शांत व मनमिळावू स्वभावामुळे होते. घटस्थापनेच्या दिवशीच त्यांच्या अशा अचानक जाणाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, भाऊ, भावजय, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









