प्रतिनिधी/कोल्हापूर
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गडहिंग्लज-कापशी रोडवर कारवाई करून, साडे सहा लाखाची गोवा मेड दारू व 10 लाखाच्या वाहनासह 16 लाख 55 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
निखील उर्फ बल्या दता रेडेकर (वय-29, रा. बटकणंगले), अमोल आनंदा तिप्पे (31, तमनाकवाडा), मंगेश अमरदास खाडे (30, मडीलगे बुद्रुक), स्वप्नील परशराम कांबळे (23, बटकणंगले), अमर लक्ष्मण नाईक (34, कोळींदे), राहूल गणपती कुंभार (25, बटकणंगले), बाळकृष्ण शंकर सुळेभवीकर (32, जांभुळवाडी) अशी अटक केलेल्या सात जणांची नावे आहेत.
विभागीय उपायुक्त वाय.एम. पवार,जिल्हा अधिक्षक संध्याराणी देशमुख,उपअधिक्षकबापूसो चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली, गडहिंग्लज-कापशी रोडवरील तमनाकवाडा बाळेघोळ तिटयावर पाळत ठेवून, 103 गोवा मेड दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले. बाजारभावानुसार या दारूची किमंत 6 लाख 31 हजार व 10 लाख 24 हजार असे वाहनासह सोळा लाख 55 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईत निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, संदीप जानकर, मारूती पोवार, सागर शिंदे, सचिन काळेज,जय शिनगारे आदीनी सहभाग घेतला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









