वार्ताहर/गोकुळ शिरगाव
कृषी कायद्याविरोधात आज संपूर्ण भारत बंद आहे. या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत मध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूचे हॉटेल व सर्व वाहतूक आज सकाळी करवीर शिवसेना तालुकाप्रमुख विनोद विनोद खोत यांच्या मार्गदर्शनाखाली बंद पुकारण्यात आला. या बंदला व्यापाऱ्यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवून सकाळीच आपले सर्व व्यवहार बंद केले.
गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाटा येथे येथे शिवसेना, आरपीआय, खोकी धारक संघटना, रिक्षा संघटना, भाजी मंडई यांच्यावतीने आज कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी शिवसेना करवीर तालुका प्रमुख विनोद खोत, शिवसेना उपतालुका प्रमुख भगवान कदम, जीवन कांबळे, शंकर खोत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleउत्सवी काळात ऑनलाइन उत्पादनांना 56 टक्के अधिक मागणी
Next Article लॅपटॉप चार्ज करणारी पॉवरबँक दाखल









